पाण्याची कमी असल्यास १ एकरात लावा ‘ही’ २ हजार झाडं; कमवाल लाखो रूपये

राज्यात सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. पण काही ठिकाणी पावसाचा थेंबही पडत नाहीये. वर्षभर पाऊस नाही आणि पावसाळ्यातही पाऊस नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण होतात.

पाणी कमी असल्यामुळे कोणतं पिक शेतात लावायचं असा प्रश्न शेतकऱ्याला पडत असतो. पाण्याच्या कमतरतेमुळे जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांची त्यांना लागवड करता येत नाही. त्यामुळे कमी वेळात जास्त उत्पन्न देणाऱ्या फळझाडांची शेती करताना शेतकरी दिसत आहे.

त्यामध्ये पेरुचं झाड हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरताना दिसून येत आहे. पेरुचे झाड लावणे अगदी सोपे असून कमी कालावधीत जास्त उत्पन्न देत असते. तसेच पेरुच्या झाडाला जास्त पाण्याचीही गरज भासत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे.

सध्या महाराष्ट्रातील शेतकरीही फळबागांच्या शेतीकडे वळताना दिसत आहे. आंबा, चिकू, मोसंबी, डाळिंब अशी फळझाडे ते लावत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही अशी शेती करायची असते, पण योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे माहिती न घेता शेती केल्यामुळे त्यांना नुकसान होते. त्यामुळे पेरुची शेती कधी करावी हे आता जाणून घेऊया.

तुम्ही पेरुची लागवच नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने वगळता वर्षभरात कधीही करु शकतात. झाडं लावताना जमिनीची आखणी करताना ६ बाय ६ मी अंतरावर ६० बाय ६० बाय ६० सेमी आकाराचे खड्डे करुन घ्या.

१५ ते २० किलो चांगले कुजलेले शेणखत ५०० ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट ५ ग्राम, फोलिडोल पावडर आणि माती यांचे मिश्रण तयार करा. त्यानंतर ते प्रत्येक खड्ड्यामध्ये भरा. एक एकर शेतीमध्येच जवळपास २ हजार झाडांचीही लागवड होते. पेरुच्या झाडासाठी उष्ण किंवा कोरडे हवामानही चालते.

ज्याठिकाणी पाऊस पडत नाही, पाण्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी पेरुची झाडे लावता येतात. लखनऊ ४९ पेरु हे संपुर्ण भारतात उत्पादित होतात. या पेरुच्या झाडाचा आकार लहान असतो. पण त्याचे पेरु फार गोड असतात.

लखनऊ ४९ पेरुच्या एका झाडापासून जवळपास १५५ किलो उत्पन्न मिळते. तैवाण पेरुची सध्या जास्त मागणी आहे. त्याच्या एका पेरुचे वजन ५०० ग्रॅम असते. या पेरुचा रंग आतून फिकट गुलाबी असतो. तसेच याची चव गोड असल्यामुळे लोकं याला पसंती देताना दिसतात.

तसेच लाल पेरुच्या झाडाचे पेरु मध्यम आकाराची असतात. या पेरुंच्या झाडाचे प्रमाण उत्तर कोकण आणि मुंबईच्या भागात जास्त आढळतात. काही वेळा झाडाला कीड लागण्याची भिती असते. त्यावेळी त्याची काळजी घेणे गरजेचे असते.

कीड, रोग नियंत्रणमध्ये ठेवण्यासाठी दोन मिली क्लोरपारिफॉस पाण्यात टाकून फवारणी करावी. देवी रोग झाल्यास ६०० ग्रॅम ब्लु विट्रीओल १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्याचा सामू सातपर्यंत करण्यासाठी ३५० ग्रॅम कळीचा चुना मिसळावा. त्यानंतर आठ दिवसांनी १०० लिटर पाण्यात २५० ग्रॅम कॅपटाफ आणि २५ ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लीन मिसळून फवारणी करावी.