तुम्ही धुतल्या तांदळासारखे नाही, लिहून द्या की…; आंबेडकरांच्या ‘त्या’ मागणीमुळे ठाकरेंची अडचणीत

राज्यात सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजून राज्यात कोणाचेही तिकीट जाहीर केले नाही. यामुळे कोणाला तिकीट मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे घोडे जागावाटपावर अडले आहे.

महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार गटाला वंचितसाठी जागा सोडाव्या लागणार आहेत. जागावाटपाचे गणित दिवसेंदिवस गुंतागुतींचे होत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांच्या नव्या भूमिकेमुळे मविआसमोरच्या अडचण निर्माण झाली आहे.

याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात दहा जागांवरून एकमत झालेले नाही. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात पाच जागांवरून एकमत झालेले नाही. त्यांच्यात एकमत झाल्यानंतर आम्ही चर्चेत सहभाग घेऊ शकतो.

तसेच पुढे ते म्हणाले, त्यांचे एकमत होत नाही, तोपर्यंत आम्ही बघ्याच्या भूमिकेत आहोत. पुढे होणाऱ्या बैठकीत आम्ही सहभागी होऊ, त्यात काय ठरते ते पाहून निर्णय घेऊ, असेही आंबेडकर यांनी सांगितले आहे. येणाऱ्या काही दिवसात याबाबत निर्णय होईल.

तसेच वंचित भाजपाची बी टीम आहे का? या आरोपावर ते म्हणाले, ज्यांनी भाजपाबरोबर याआधी सत्ता स्थापन केलेली आहे. त्यांनी आपण धुतल्या तांदळासारखे आहोत, असे दाखवू नये. आता ते धुतल्या तांदळेसारखे झाले आहेत, म्हणूनच आम्ही प्रस्ताव दिला आहे की, तुम्ही यापुढे भाजपा बरोबर जाणार नाहीत, असे मतदारांना लिहून द्या.

दरम्यान, आम्ही अजून आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही. तीन पक्षांचे भांडण संपल्यानंतर आमच्याशी चर्चा सुरू होईल. अद्याप त्यांचीच भांडणे संपलेली नाहीत तर मग आमच्याशी काय चर्चा होणार आहे, असेही आंबेडकर यांनी सांगितले.