मुकेश अंबानी मुंबईतील ‘या’ रेस्टॉरंटमधून करतात ऑर्डर, 50 रुपयात पूर्ण जेवण, काय आहे खासियत?

उद्योगपती मुकेश अंबानी हे एक मोठे श्रीमंत उद्योगपती म्हणून जगभरात ओळखले जातात. ते खाण्यापिण्याचे शौकीन आहेत. यामुळे त्याची एक वेगळीच चर्चा सुरू असते. मुकेश अंबानी यांना मसालेदार पदार्थ खूप आवडतात. दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ आवडीने खातात.

आता त्यांच्या आवडीच्या ठिकाणची एक माहिती समोर आली आहे. 88 वर्ष जुने दक्षिण भारतीय रेस्टॉरंट हे त्यांचे आवडते ठिकाण आहे, जिथून ते दर आठवड्याला जेवण ऑर्डर करतात. त्यांच्या मुलांनाही रेस्टॉरंटची चव आवडते. मुकेश अंबानी यांनी एका मुलाखतीत या रेस्टॉरंटबद्दल खुलासा केला आहे.

याबाबत माहिती अशी की, मुंबईचे प्रसिद्ध कॅफे म्हैसूर माटुंगा हे मुकेश अंबानींचे आवडते रेस्टॉरंट आहे. ते येथून दर आठवड्याला जेवण ऑर्डर करतात. यामुळे त्यांना याठिकाणचे पदार्थ खुपच आवडतात.

कॉलेजच्या दिवसांपासून या रेस्टॉरंटमध्ये येत असत. त्यांना इथली चव इतकी आवडली की आजही ते याठिकाणी ऑर्डर करतात. प्युअर व्हेजिटेरियन कॅफे सामूर 1936 मध्ये सुरू झाले. मुंबई कॅफे म्हैसूर हे माटुंग्यातील सर्वात जुन्या रेस्टॉरंटपैकी एक आहे.

चौथी नापास ए रामा नायक यांनी या कॅफेची सुरुवात केली. त्यांनी किंग्ज सर्कल रेल्वे स्टेशनजवळ केळीच्या पानांवर इडली आणि डोसा बनवून विकायला सुरुवात केली. नंतर त्यांनी हा व्यवसाय वाढवत नेला. त्याच्या छोट्याशा दुकानासमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

पुढे त्यांनी त्यांनी माटुंगा येथे पहिले दक्षिण भारतीय रेस्टॉरंट उघडले. यानंतर, त्याने आणखी तीन रेस्टॉरंट उघडले. रामा यांनी उडुपी कृष्ण भवन, कॅफे म्हैसूर, उडुपी कॅफे आणि आता इडली हाऊस हा ब्रँड बनवला. दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांसाठी या रेस्टॉरंट्सबाहेर रांगा लागलेल्या असतात.