जमिनीखाली सापडला ११ हजार वर्षांपूर्वीचा खजिना, पाहून सगळेच हादरले, धक्कादायक माहिती उघड

आपण बघतो की, खजिना पैसा किंवा सोने, चांदी, किंवा तळघर पोटमाळा यांसारख्या ठिकाणी लपवलेले अनेक वेळा साडपलेले आहे. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे. तुर्कीमध्ये हा खजिना सापडला आहे. याची चर्चा जोरदार सुरु आहे. पुरातत्व शास्त्रज्ञांना जमिनीच्या आत तब्बल ११ हजार वर्ष जुना खजिना सापडला आहे.

यामध्ये अनेक भयंकर गोष्टी सापडल्या आहेत. जेव्हा सापडलेल्या गोष्टींचा तपास करण्यात आला तेव्हा ते पाहून साऱ्यांना धक्का बसला. बोनकुक्लू तरला येथे हा शोध लागला आहे. सद्या पुरातत्व शास्त्रज्ञ याता सखोल तपास करत आहेत.

पुरातत्व शास्त्रज्ञांनानी सांगितले की, दागिने त्यांच्या कानात आणि नाकात सापडून आले. त्यामुळे हे स्पष्ट होते की हे दागिने कान आणि नाकात छिद्र करुन परिधान केले जात होते. या शोधात सापडलेल्या दागिन्यांपैकी ८५ दागिने हे चांगल्या अवस्थेत आहेत. हे दागिने जास्तकरुन चुना दडगं, ओब्सीडियन किंवा नदीच्या दगडांनी बनलेले आहेत.

हे दागिने फक्त महिला नाही तर पुरुषही परिधान करायचे असंही दिसून आले आहे. तसेच आता लहान वयातच कान आणि नाक टोचले जातात. मात्र, तेव्हाच्या काळात असं होत नव्हते. तेव्हा फक्त वयस्क लोकांचे कान-नाक टोचले जात होते. जिथे लहान मुलांचे सांगाडे सापडले तिथे आम्हाला कुठल्याही प्रकारचे दागिने सापडले नाही.

म्हणजेच तेव्हा लहान मुलांचे नाक-कान टोचले जात नव्हते. या शोधात सहभागी असलेल्या डॉ. एम्मा बैसल यांनी सांगितलं की, ‘यावरून असे दिसून येते की, ज्या परंपरा अजूनही आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत त्या हजारो वर्षांपूर्वी विकसित झाल्या होत्या.

१०,००० वर्षांपूर्वी लोकांनी पश्चिम युरोपमध्ये प्रथम प्रवेश केला आणि तिथे स्थायिक होऊ लागले तेव्हापासून या परंपरा आहेत. त्यांच्याकडे मोती, बांगड्या आणि लॉकेटशी संबंधित अत्यंत किचकट सजावट पद्धती होती. ज्यामध्ये मानवी शरीराच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेल्या एका अत्यंत विकसित प्रतीकात्मक जगाचा देखील समावेश होता.

दरम्यान, जमिनीच्या उत्खणनादरम्यान मानवी हाडांसह वेगवेगळ्या धातुंचे दागिनेही सापडले आहेत. हे दागिने त्या मानवी हाडांवर सापडले आहेत. जेव्हा यांची कार्बन डेटिंग करण्यात आली तेव्हा हजारो वर्षांपूर्वीपासून चालत अलेल्या कान आणि नाक टोचण्याच्या परंपरेचे पुरावे सापडले आहेत.

अंकारा विश्वविद्यालयाच्या टीमने १०० हून अधिक दागिन्यांचा तपास केला. आतापर्यंत असे मानले जात होतं की कान-नाक टोचण्याची परंपरा ही १००-२०० वर्ष जुनी असेल. पण, सध्याच्या तपासातून असं दिसून आलं की ही परंपरा १००० वर्षांपूर्वीही अस्तित्वात होती.