सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याची घोषणा आज अखेर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. देशात ७ टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील निवडणूक १९ एप्रिलला होणार असून ४ जूनला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात २६ एप्रिलला मतदान होणार आहे. तसेच ४ जूनला सर्व देशात मतमोजणी होईल. राजीव कुमार यांनी मतदारांची आकडेवारी देखील दिली आहे. त्यानुसार १.८२ कोटी पहिल्यांदाचा मतदान करणार आहेत.
१८ ते २९ वयोगटातील २१.५० कोटी मतदार आहेत. ८२ लाख मतदार हे ८५ वयापेक्षा अधिक आहेत. यावेळी अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. मतदानाच्या काळात सोशल मीडियावर बऱ्याच अफवा पसरल्या जातात. त्यामुळे वातावरण खराब होण्याची शक्यता असते.
त्यामुळे आता जर कोणतीही सोशल मीडियावरील पोस्ट ही आक्षेपार्ह असेल किंवा त्यामुळे निवडणुकीचे वातावरण खराब होण्याची शक्यता आहे, त्या पोस्ट काढून टाकण्याचे अधिकार आम्ही राज्य सरकारला दिले आहेत.
काही राज्यात बळाचा तर काही राज्यात पैशाचा गैरवापर होतो. तसेच फुकट वाटल्या जाणाऱ्या गोष्टी रोखण्यासाठी यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या निवडणुकांमध्ये आम्ही कोणत्याही पद्धतीच्या बळाचा आणि पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही.
तसेच कुठेही हिंसा झाल्यास अजिबात दया दाखवली जाणार नाही, असं म्हणत राजीव कुमार यांनी उमेदवारांना देखील इशारा दिला आहे. यामुळे आता उमेदवार कामाला लागले आहेत. नवीन सरकार कोणाचे स्थापन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.