ऊसतोड मजूर हंगाम संपवून आनंदात घरी निघाले, पण वाटेत घडलं विपरीत, चौघांचा मृत्यू, घटनेने सगळेच हादरले…

ऊसतोड कामगार गावाकडे जात असताना एक दुर्देवी घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबलेल्या कामगारांवर पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडकेत ऊसतोडणी मजुरांसह चौघांचा मृत्यू झाला.

तसेच या घटनेत तब्बल १० जण जखमी झाले आहेत. मृतांतील तिघे चिखलगीचे तर एक जण शिरनांदगीचा आहे. ही घटना नागपूर-रत्नागिरी महामार्गावर नागज फाट्याजवळ मध्यरात्री दोनच्या दरम्यान घडली आहे. याबाबत तपास सुरू आहे.

या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शालन दत्तात्रय खांडेकर (वय ३० रा. शिरनांदगी) जगमा तम्मा हेगडे (वय ३५ ) दादा आप्पा ऐवळे (वय १७) निलाबाई परशुराम ऐवळे (वय ३ रा. चिक्कलगी अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील अनेकजण रोजगाराचे साधन नसल्यामुळे रोजगारासाठी ऊस तोडणीसाठी याठिकाणी येत असतात. त्यांना सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी जावे लागते. तसेच पुणे जिल्हात देखील अनेकजण जातात.

दरम्यान, येथील काही ऊसतोड मजूर ऊसतोडणीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या ठिकाणी गेले होते. चालू वर्षीचा हंगाम संपवून ते आपल्या घरी जात असतानाच ही घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मध्यरात्री दोन वाजता ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभा करुन दुरुस्त केला जात होता. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या आंध्रप्रदेशातील ट्रकने मागू येऊन धडक दिली. यामध्ये ते अक्षरशः हवेत उडून गेले.