महाराष्ट्राला पुन्हा अवकाळीचा तडाखा बसणार, गारपीट अन् मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट…

सध्या दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विदर्भात देखील गारपीट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. पाऊस झाल्यास नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळू शकतो. मात्र शेतीचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठवाड्यात देखील उष्णतेची लाट आहे, अनेक जिल्हांमध्ये कमाल तापमान हे 40 ते 45 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे.

असे असताना मात्र त्यातच आता पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. सध्या राज्यात सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी वातावरण चांगलेच गरम झाले आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आता देशात आज वातावरण कोरडं राहणा असून उद्यापासून पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देशात एकीकडे पाऊस तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. 4 आणि 5 एप्रिलदरम्यान उत्तर कर्नाटकातील वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे.

यामध्ये पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये वेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 4 ते 6 एप्रिल दरम्यान झारखंड, तेलंगणा आणि रायलसीमा येथे वेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्मी वाढणार आहे.

आजपासून महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगाने तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. यामध्ये पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.