समोसामध्ये बटाट्याऐवजी कंडोम! पुण्यातील किळसवाण्या प्रकाराने उडाली खळबळ…

पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका प्रतिष्ठित कंपनीच्या कँटिंगमधील समोशामध्ये कंडोम, दगड, गुटखा यासह अनेक इतर वस्तू आढळल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास केला जात आहे.

याबाबत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका उपकंत्राटदार कंपनीच्या दोन कामगारांचा समावेश आहे. ज्यांना समोसे पुरवठ्याचे कंत्राट मिळाले होते. तसेच ते भेसळ केल्याप्रकरणी यापूर्वी कारवाई करण्यात आलेल्या अशा अन्य फर्मचे तीन भागीदार आहेत.

याबाबत तपास सुरू आहे. यापूर्वी कारवाई झालेल्या तीन भागिदारांना त्यांचे कंत्राट गेल्याचा राग होता. त्यामुळे नवे कंत्राट मिळालेल्या पुरवठादाराला बदनाम करण्यासाठी त्यांनी त्यांचे दोन कर्मचारी नव्या कंत्राटदाराकडे कामाला लावले होते, अशी देखील माहिती समोर आली आहे.

कॅटलिस्ट सर्व्हिस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या फर्मकडे ऑटोमोबाईल कंपनीच्या कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ पुरविण्याचे कंत्राट आहे. या फर्मने मनोहर एंटरप्रायझेस नावाच्या दुसऱ्या उपकंत्राटदार कंपनीला समोसे पुरवण्याचे कंत्राट दिले होते. ऑटोमोबाईल कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना समोश्यामध्ये कंडोम, गुटखा आणि खडे सापडले.

मनोहर एंटरप्रायझेसच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यानंतर, असे समोर आले की फिरोझ शेख आणि विकी शेख या दोन कर्मचाऱ्यांनी समोश्यामध्ये कंडोम, गुटखा आणि खडे भरले होते. या घटनेची गंभीर दखल घेत आरोपींवर विषाद्वारे दुखापत करणे आणि गुन्हेगारी कट रचणे या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ऑटोमोबाईल कंपनीला यापूर्वी SRA एंटरप्रायझेसला अन्नपुरवठा करायचे. पण ते पुरवत असलेल्या अन्नामध्ये मलमपट्टी आढळली होती. त्यानंतर कंपनीने त्याचा करार रद्द केला होता. या रागातून त्यांनी मनोहर एंटरप्रायझेसची बाजारातील प्रतिष्ठा खराब करण्यासाठी हे कृत्य केले. यामुळे मात्र पुण्यात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.