राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक धक्कादायक घटना घडत आहे. दरड कोसळण्याच्या, घर पडण्याच्या घटनाही समोर येत आहे. आता कोल्हापूरमध्ये एका महिलेने भिंत अंगावर कोसळल्यामुळे जीव गमावला आहे.
संबंधित घटना ही आजरा तालुक्यातील किणे गावात घडली आहे. मुसळधार पावसामुळे भिंत अंगावर पडल्यामुळे महिलेने आपला जीव गमावला आहे. मोठ्या कष्टाने पैसे जमा करुन त्यांनी ते घर बांधले होते. पण त्याच घराने त्यांचा जीव घेतला आहे.
या घटनेमुळे संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुनिता गुडुळकर असे त्या महिलेचे नाव आहे. सुनिता यांच्या जाण्याने गुडुळकर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारात ही घटना घडली आहे.
किणे गावात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. जोरदार वाराही सुरु असल्यामुळे भिंती पडताय, झाडे तुटताय अशा गोष्टी घडताय. त्यात गुरुवारी सकाळी सुनिता गोठ्यात गेल्या असताना मातीची भिंत त्यांच्या अंगावर पडली.
अंगावर भिंत पडल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात येत होते. पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये त्यांच्यासोबत वत्सला या सुद्धा जखमी झाल्या होत्या.
सुनिता आणि त्यांचे कुटुंब प्राथमिक शाळेच्या घरासमोर राहत होते. त्यावेळी सकाळी सुनिता या गोठ्यामध्ये गेल्या होत्या. त्यात एक भिंत चिऱ्याच्या भिंतीवर कोसळली. त्यामुळे सुनिता या चिऱ्याखाली आल्या. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात येत होते. पण वाटतेच त्यांचा मृत्यू झाला.