ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार रामदास तडस यांच्या मुलावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. रामदास तडस यांच्या मुलाने पत्नीला रस्त्यावर आणलं सध्या तिच्याकडे मुलाचा सांभाळ करण्यासाठी काहीच पैसे नसल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे.
यामुळे कारवाईची मागणी केली आहे. यावेळी अंधारे यांच्यासोबत रामदास तडस यांच्या सून पूजा तडसही मुलासह उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. पूजा यांच्याशी खासदार रामदास तडस यांच्या मुलाने कोणत्या परिस्थितीमध्ये लग्न केलं हे सर्वांना माहिती आहे.
कारवाई टाळण्यासाठी हे लग्न कऱण्यात आले होते. असेही अंधारे यांनी सांगितले आहे. मात्र कुटूंबाने संभाळ केला नाही. लग्नानंतर तिला जे घर दिले ते देखील विकले गेले. यामुळे तिच्याकडे काहीही राहिले नाही. आज मुलाची सांभाळ करायला ही तिच्याकडे आर्थिक तरतूद नाही.
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी यावेळी विवाह प्रमाणपत्रंही दाखवले. लग्न करुनही जे आपला परिवार सोडून देतात, ते मोदी का परिवार हॅशटॅग लावतात हे भयंकर आहे, असेही अंधारे यांनी सांगितले आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
अनेकदा तिचा अपमान करण्यात आला. ती गरोदर असताना तिची कसलीही काळजी घेतली गेली नाही. तिच्या वडिलांसमोर बापाचे पुरावे मागण्यात आले, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, यावेळी पूजा तडस यांनी सांगितलं की, आपल्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी माझ्याशी लग्न केलं का? लग्नानंतर मला उपभोगाची वस्तू म्हणून वापरण्यात आलं. त्याच्यातून बाळाचा जन्म झाला. ते कोणाच आहे, अस म्हणून मारहाण झाल्याचे त्यांनी सांगितले.