मोठी बातमी! अण्णा भाऊ साठेंचे नातू सचिन साठेंच्या हाती मशाल, ठाकरेंनी जुळवलं लोकसभेच गणित

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. सध्या अनेकांना आपल्या पक्षात घेतले जात आहे. उमेदवार जाहीर केले जात आहेत. सभा सुरू आहेत. सध्या उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक बातमी समोर आली आहे.

आता अण्णा भाऊ साठेंचे नातू सचिन साठेंनीही उद्धव ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे. यामुळे आता अनेक मतदार संघात गणित जुळून येणार आहेत. अण्णा भाऊ साठेंच्या नातवाचा पाठिंबा मिळवून उद्धव ठाकरेंनी मोठी आघाडी घेतल्याचे सांगितले जात आहे.

सचिन साठेंची नेमकी ताकद जास्त नसली तरी अनेक मतदार संघात ठाकरे त्यांना प्रकारासाठी उतरवतील. अण्णा भाऊ साठेंच्या सामाजिक आणि प्रबोधन चळवळीचा वारसा घेऊन सचिन साठे राजकारणात उतरलेत. सचिन साठेंना आता मातोश्रीची सावली मिळाली आहे.

सध्याच्या राजकीय लढाईसाठी ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीला साठेंच्या पुढच्या पिढीने साथ दिलीय. सचिन साठे हे अण्णा भाऊ साठे यांचे सुपुत्र संजय साठेंचे चिरंजीव सचिन साठे सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. मात्र अजूनही त्यांना आमदारकी किंवा इतर काही पद मिळवता आले नाही.

सचिन साठेंकडून राज्याबाहेरही व्याख्यानांचे कार्यक्रम घेतले जातात. मातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज एकजूट करण्याचे सचिन साठेंचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यांनी मानवहित लोकशाही पक्षाची स्थापना देखील केली आहे.

आता ठाकरे गटात प्रवेश करत सचिन साठेंकडून विधानसभेची तयारी सुरू केली आहे. सचिन साठेंनी आता ठाकरेंचं पारडं जड केले आहे. सचिन साठेंनी साथ दिल्याने उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रभर फायदा होईल. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.