देशभरात लोकसभा निवडणुका सुरू असून काही ठिकाणी मतदान देखील पार पडले आहे. यामुळे अनेक ठिकाणी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १९ तारखेला पहिल्या टप्प्यासाठी १०२ मतदारसंघात मतदान झाले. अनेकांचे भविष्य मतदान पेटीत बंद झाले.
आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. असे असताना आता लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे खाते उघडलं आहे. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने उर्वरित उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झाले.
यामुळे भारतीय जनता पक्षासाठी आनंदाची बातमी आली आहे. सुरत लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्यानंतर उर्वरित ८ उमेदवारांनीही आपली नावे मागे घेतली. यामुळे भाजप उमेदवाराचा एकमेव अर्ज असल्याने त्यांचा विजय झाला आहे.
यामुळे आता लोकसभा निवडणुकीत भाजपचे खातेही उघडले आहे. मुकेश दलाल येथून भाजपचे उमेदवार आहेत. सुरत लोकसभा मतदारसंघातून पहिल्याच दिवशी काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने येथील समीकरण बदलून गेले. यामुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
बीएसपीचे उमेदवार प्यारे लाल भारती यांनी देखील अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतला. मुकेश दलाल हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष सीआर पाटील यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जाता. सुरत लोकसभा मतदारसंघात बिनविरोध निवड झालेले ते पहिले खासदार ठरले.
दरम्यान, उर्वरित ठिकाणी मतदान प्रचार सुरू आहे. अनेकांचे दौरे देखील वाढले आहेत. यामुळे 4 जूनला कोण गुलाल खेळणार आणि कोण पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून सध्या निवडणूक आयोग देखील सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे.