बारामती हादरली! तक्रार घेतली नाही अन् त्याचं डोकं फिरलं, कोयत्याने महिला तंत्रज्ञावर हल्ला, महिलेचा मृत्यू…

बारामतीमधील मोरगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मीटर रीडिंग तपासावे अशी सातत्याने मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने एका वीज ग्राहकाने महावितरणच्या टेक्निशियन महिलेवर चक्क कोयत्याने वार केलेल्या महिला कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

यामुळे सगळेच हादरले असून याबाबत पोलीस तपास करत आहेत. रिंकू राम थिटे असे महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. कोयत्याने गंभीर वार झाल्याने कर्मचारी गंभीर जखमी झाली होती. घटनेनंतर या महिला कर्मचाऱ्यास पुण्यात हलवण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने महावितरणमध्ये मात्र प्रचंड खळबळ उडाली आहे.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी अभिजीत पोते याला अटक केली असून अभिजीत पोते हा महावितरणचा वीज ग्राहक असून त्याच्या घरातील विज बिल सातत्याने जास्त येते अशी तो तक्रार करत होता. यामुळे एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, माझ्या घराचे वीज बिल मीटरचे रीडिंग घेऊन हे बिल का जास्त येते हे पहा असे तो सातत्याने सांगत होता. मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जात आहे. यातून वाद वाढत गेला आणि पुढे असा धक्कादायक प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

त्याने चिडून जाऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. यामध्ये रिंकू राम थिटे ही तांत्रिक कर्मचारी महिला त्याच्याशी बोलत असताना त्याने रागाने तिच्यावर कोयत्याने वार केले. यातून त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. त्यांना लगेच पुण्यात हलवण्यात आले, मात्र त्यांचे निधन झाले.

दरम्यान, मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली. बारामती तालुक्यातील मोरगाव येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. अचानक झालेल्या या घटनेने रिंकू बनसोडे ही घाबरली होती.