पुणेकराचा राडा! नोकरीचा राजीनामा, बॉसला खुन्नस, ढोला-ताशा वाजवून कंपनीला धुमधडाक्यात रामराम…

देशात अनेक ठिकाणी रोजगार उपलब्ध नसल्याने अनेकजण कंटाळून जॉब करतात. इच्छा नसताना देखील त्यांना जॉब करावा लागतो. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली इच्छा नसतानाही दररोज दिवसरात्र नोकरी करावी लागते. यातून अनेकांचे घर चालते.

अनेकजण नोकरीत समाधानी नसतात, तरीही आर्थिक गरज भागविण्यासाठी, आपल्या उदरनिर्वाहासाठी, कुटंबांसाठी नोकरी करावीच लागते. नोकरीच्या ठिकाणी बॉसचे ताणेबाणे खाऊन, काहीवेळा अपमान सहन करावा लागतो. यामुळे अनेकजण या सगळ्या गोष्टींना वैतागले आहेत.

असे असताना पुण्यातील एका युवकाने नोकरी सोडल्याचा आनंद धुमधडक्यात साजरा केला. नोकरी सोडल्यानंतर ऑफिसमध्ये ढोलताशा वाजवत डान्सही केला. काहीजण कंपनीतील वातावरण पूरक नसल्याने, काहीजण पगार कमी असल्याने, काहीजण बॉसच्या कटकटीमुळे नोकरीचा राजीनामा देतात.

अनेकदा तसेच चित्र समोर आले आहे. आता पुण्यातील अशाच एका कर्मचाऱ्याने नोकरीचा राजीनामा दिला असून कंपनीतील शेवटचा दिवस धुमधडाक्यात साजरा केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

हा तरुण म्हणाला की, मी गेल्या तीन वर्षांपासून कंपनीत नोकरी करत होतो. मात्र, गेल्या तीन वर्षात केवळ काही प्रमाणात माझ्या पगारात वाढ झाली. तसेच, कंपनीत काम करताना बॉसकडूनही आदर, सन्मान मिळत नव्हता. यामुळे त्याने नोकरी सोडली.

दरम्यान, नोकरीच्या शेवटच्या दिवशी त्याचे सहकारी मित्र एकत्र आले. त्यांनी कंपनीच्या कार्यालयाबाहेरच ढोल-ताशा आणला होता. कंपनी कार्यालयाबाहेरील हे दृश्य पाहून अनिकेतचा बॉस संतप्त झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.