एक घर अन् ६ हत्या, आत्महत्येचा दावा, पण मास्टरमाईंड प्लॅन, भयंकर माहिती आली समोर…

उत्तर प्रदेशामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील सीतापूरमधील ६ संशयास्पद मृत्यू झाले होते. आता या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा खून मृताचा भाऊ आणि सहाय्यक शिक्षक अजित सिंग याने केला होता.

तो या हत्येचा आरोपी असल्याचे समोर आले आहे. हे खून केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने एक कथा रचली. मात्र आता याबाबत खरी माहिती समोर आली. सध्या आरोपी अजित पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची चौकशी सुरू आहे. याठिकाणी आई, भाऊ, त्याची पत्नी आणि तीन मुलांची हत्या करणारा आरोपी मोठा भाऊ अजित आहे.

शिक्षक असलेल्या अजित सिंगने सहा जणांची हत्या केल्यानंतर एक कथा रचून संपूर्ण दोष आपल्या भावावर टाकला. चौकशीनंतर मोठा भाऊ अजित सिंग याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. याबाबत सुरुवातीला कोणाला काही संशय आला नाही. हत्येनंतर अजितने रक्ताने माखलेले कपडेही धुतल्याचे कळते. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने आपले कपडेही लपवले.

फॉरेन्सिक टीमने हे कपडेही जप्त केले आहेत. ४५ वर्षीय अनुराग सिंग, त्यांची पत्नी प्रियांका ४०, आई सावित्री ६२, यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. प्रियांकाची तीन मुले अर्ना (१२), आर्वी (८) आणि मुलगा अद्विक (४) यांना छतावरून फेकून देण्यात आलं होतं.

नंतर अनुरागचा मोठा भाऊ अजितने पोलिसांना सांगितले की, अमली पदार्थांच्या व्यसनामुळे अनुरागने पत्नी प्रियांका आणि आई सावित्रीसह तीन मुलांची हत्या केली. यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. असा बनाव त्याने केला.

यामध्ये पोलिसांनी या खुनांसाठी अनुरागला जबाबदार धरले. मात्र डीजीपी प्रशांत कुमार यांच्या मध्यस्थीनंतर आयजी रेंज तरुण गाबा स्वतः घटनास्थळी पोहोचले. त्यांनी याबाबत चौकशी केली. अजित अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात अडकला, यामुळे संशय बळावला.