दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर भागात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. ते जबलपूरचे होते. यामुळे कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणी रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे.
या घटनेची माहिती या दोघांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आली तेव्हा त्यांनी एकच आक्रोश केला. अश्विनी कोस्टा आणि अनिस अहुदिया असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वेदांत अग्रवाल याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, या अपघातात मृत्युमुखी पडलेली अश्विनी कोस्टा हिचं वर्क फ्रॉम होम सुरु होते. या दिवशी तिची आई तिला म्हणाली की कंटाळा आला असेल तर जरा बाहेर फिरुन ये, रिफ्रेश होशील. यामुळे ती तिच्या मित्रांसोबत पार्टी करायला गेली होती. मात्र घटनेची माहिती त्यांना मिळाली तेव्हा त्यांना एकच धक्का बसला.
अश्विनीच्या आईने रुग्णालयात पोहोचताच टाहो फोडला. ती तिच्या वडिलांच्या वाढदिवशी जबलपूरला घरी जाणार होती, मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ती तिच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जबलपूरला आपल्या घरी जाणार होती.
तिने याबाबत तिच्या वडिलांना सांगितलं नव्हतं, ती त्यांना सरप्राइज देणार होती, पण आता त्यांची लेक खूप लांब निघून गेली आहे, तिथून ती पुन्हा कधीही परतणार नाही. आईने रडत रडत याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाला बार आणि पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांनाही अटक करण्यात आली आहे.
या मुलाने चालविलेल्या कारला नंबर देखील नव्हता. तसेच आता ही कार विनानोंदणीच रस्त्यावर धावत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे याबाबत अनेकजण अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही कार इतके दिवस विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.