काय सांगता! आता रिचार्ज न करता पाहा टीव्ही, सरकारने आणली Free Dish सेवा, जाणून घ्या…

डिश टीव्हीचा रिचार्ज करणे ही एक अनिवार्य बाब आहे. महिन्याला किंवा वर्षाला रिचार्ज करावाच लागतो. हा एक महिन्याच्या खर्चातील महत्त्वाचा खर्च असून आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारकडून फ्री डिश Connection हा पर्याय दिला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सेवेच्या मदतीने तुम्ही घरात सहज डीश टीव्ही लावू शकतो. तसेच युझर्सला रिचार्ज करण्याची गरज पडणार नाही. यामुळे तुमच्यासाठी ही एक फायद्याची बाब आहे. डीटीएच फ्री डिशद्वारे टीव्ही प्रेमी लोकांसाठी फ्री चॅनल्स लिस्ट जाहीर केलं आहे.
यामध्ये अंतर्गत अनेक क्षेत्रात आणि भाषांमध्ये फ्री चॅनल पुरविले आहेत.

या फ्री चॅनल अंतर्गत तुम्ही टीव्हीमध्ये नवे चॅनल्स डाऊनलोड करु शकता. महत्त्वाचे म्हणजे हे चॅनल्स तुम्हाला अतिशय फ्री पाहता येणार आहे. DD कडून Free Dish DTH सेवेचा पर्याय दिला जात आहे. हे सार्वजनिक सेवा प्रसारक प्रसार भारती द्वारे प्रदान केले जाते.

दरम्यान, या सेवेचा लाभ घेतल्यानंतर, तुम्हाला फ्री-टू-एअर (FTA) डायरेक्ट-टू-होम (DTH) दिले जाते. याचा अर्थ तुम्हाला दर महिन्याला रिचार्जची काळजी करण्याची गरज नाही. एकदा गुंतवणूक करून तुम्ही ही सेवा सहज मिळवू शकता. ही सेवा घेण्यासाठी तुम्हाला एकदाच 2 हजार रुपये खर्च करावे लागतील. यानंतर कोणतेही रिचार्ज करण्याची गरज नाही.

यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी मोफत टीव्ही चॅनेल बघायला मिळतील. याशिवाय आता कॉम्पॅक्ट आकाराचा अँटेनाही उपलब्ध आहे. हे देखील खूप मोठे DTH प्लॅटफॉर्म आहे. डिशसाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. यासाठी २ क्रमांक देण्यात आले आहेत. पहिला क्रमांक आहे- 1800114554 तर दुसरा क्रमांक- 011-25806200.. तुम्ही या क्रमांकांवर संपर्क करून माहिती मिळवू शकता.

तुम्ही स्थानिक केबल ऑपरेटरच्या मदतीने यासाठी अर्ज देखील करू शकता. या प्रक्रियेचाही अवलंब केला जात आहे. रिसीव्हर स्थानिक पातळीवरही बसवता येतो. पण फी भरावी लागेल. यामुळे या संधीचा फायदा घेण्याचे कंपनीकडून सांगितले गेले आहे.