प्रसिद्ध कीर्ती व्यास खून प्रकरणात सत्र न्यायालयाने सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजलानी यांना दोषी ठरवले. याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून तपास सुरू होता. ६ वर्षांपूर्वी झालेल्या या हत्या प्रकरणात तपास पथकाला आजपर्यंत कीर्तीचा मृतदेह सापडलेला नाही. यामुळे तपासात नेमकं काय घडलं? याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या तपासात काही अवशेषही सापडले नाहीत. परंतु गुन्हे शाखेकडे अनेक डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे होते, न्यायालयाने ते पुरेसे मानले आणि या हत्याकांडातील दोन्ही आरोपींना दोषी ठरवले. २०१८ मध्ये ही हत्या झाली होती. त्यानंतर याबाबतचा तपास सुरू होता.
याबाबत पोलिसांनी आरोपींना २०१८ मध्ये अटक केली होती. नंतर तीन वर्षांनी खुशी सजलानीला सुप्रीम कोर्टातून जामीन मिळाला, पण सिद्धेश ताम्हणकर तुरुंगातच होता. नंतर खुशी सजलानीची फोर्ड इकोस्पोर्ट कार मुंबई क्राइम ब्रँचने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली, तेव्हा या प्रकरणातील पहिला पुरावा सापडला.
या घटनेतील कारच्या सीटच्या पुढील आणि मागील बाजूस वाळलेल्या रक्ताच्या खुणा आढळून आल्या. हे रक्त कीर्तीच्या पालकांच्या रक्ताशी मॅच करण्यात आले असता त्यांचा डीएनए मॅच झाला. यामुळे कीर्तीही या कारमध्ये असल्याची पुष्टी झाली.
त्यानंतर सिद्धेश ताम्हणकरचीही चौकशी करण्यात आली. अखेर या दोन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. यामुळे या घटनेचा तपास सहा वर्षांनी झाला. दरम्यान, खुशी सजलानी आणि सिद्धेश ताम्हणकर हे कीर्तीच्या घरा डी. बी. मार्ग परिसरात गेले. ती ऑफिससाठी घरून निघताच दोन्ही आरोपींनी तिला काही तरी बहाण्याने कारमध्ये बसवले.
यावेळी कामावरून काढण्यात आलेल्या नोटीसवर सिद्धेशला दिलेली नोटीस परत घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. जेव्हा कीर्तीने त्यांचे ऐकण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी कारमध्ये तिचा गळा आवळून तिची हत्या केली. तिचा मृतदेह कारच्या मागच्या बाजूला खाली टाकला. यानंतर सिद्धेश गाडीतून खाली उतरला, मग तो परळ येथील घरी गेला तिथून तो ऑफिसला गेला.
नंतर खुशी सजलानीने मृतदेह असलेले वाहन सांताक्रूझ येथील तिच्या इमारतीत नेले. दोघांनी चेंबूरजवळील मेहुल गावातील नाल्यात कीर्तीचा मृतदेह फेकून दिला. दरम्यान, गाडीत पिरियड ब्लड आढळून आले, त्यावरुन या हत्येचे गूढ उकलले. मात्र, खुशीचा मृतदेह कधीच सापडला नाही. यामुळे तपासाला खूप वेळ लागला.