केंद्रात सत्ता आल्यास महालक्ष्मी योजना राबवणार असल्याचे आश्वासन काँग्रेसने या लोकसभा निवडणुकीत दिलं आहे. या योजनेच्या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंब प्रमुखांच्या खात्यात दरमहा ८५०० रुपये थेट जमा केले जातील, असे आश्वासन काँग्रेसने जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलं आहे. यामुळे याची बरीच चर्चा झाली.
सत्ता आल्यावर तुमच्या खात्यात खटाखट खटाखट पैसे जमा करु, असे राहुल गांधी एका सभेत म्हणाले होते. त्यांचा व्हिडीओ व्हायरलही झाला होता. असे असताना आता काही राजकीय पक्ष महिलांच्या पोस्ट खात्यात ८५०० रुपये जमा करणार असल्याची अफवा कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये पसरली.
यामुळे महिलांनी पहाटेच्या सुमारास पोस्टाबाहेर तोबा गर्दी केली. बंगळुरुतील जनरल पोस्ट ऑफिसच्या बाहेर प्रचंड मोठी रांग लागली. महिला खाती उघडण्यासाठी रांगेत उभ्या होत्या. यामुळे नंतर ही एक अफवा असल्याचे दिसून आले.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाती उघडण्यासाठी महिलांची पोस्ट ऑफिसबाहेर झुंबड उडाली. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला विजय मिळाल्यास, केंद्रात त्यांची सत्ता आल्यास आपल्या खात्यात दर महिन्याला ८५०० रुपये जमा होतील, अशी आशा महिलांना आहे. यामुळे त्यांनी याबाबत गर्दी केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातले मतदान १ जूनला होईल. ४ जूनला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. पोस्टत खातं उघडल्यापासून पैसे येण्यास सुरुवात होईल, असे परिसरातील प्रत्येक जण सांगत असल्याने पोस्टात आल्याचे अनेक महिलांनी सांगितले आहे.
पोस्टाबाहेर गर्दी करणाऱ्या बहुतांश महिला शिवाजीनगर,चामराजपेठ आणि आसपासच्या भागातील होत्या. महिलांची संख्या अधिक असल्याने मोकळ्या जागेही काऊंटर्स उघडली गेली. यामुळे याची मोठी चर्चा याठिकाणी झाली. ८५०० रुपये जमा होणार असल्याची अफवा काँग्रेसच्या काही आमदारांनी पसरवल्याचे समजतं.