पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने सध्या सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. येथील नऱ्हे परिसरात एका तरुण बांधकाम व्यावसायिकाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यामुळे सगळेच हादरले आहेत.
याठिकाणी रिअल इस्टेट एजंटने स्वत:वर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी उशिरा उघडकीस आली आहे. सध्या पुण्यात दिवसेंदिवस अनेक धक्कादायक घटना घडत असताना आता हा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयूर सुनील नरे (वय.३१ रा. जांभूळवाडी, आंबेगाव, पुणे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही घटना का घडली, याबाबत पोलीस तपास सुरू आहे. नऱ्हे येथील सेवा रस्त्यालगत असलेल्या सिद्धिवीनायक अंगण सोसायटी येथे काव्या ग्रुप म्हणून मयूर नरे यांचे व्यावसायिक कार्यालय आहे.
ते गेल्या काही वर्षांपासून बांधकाम प्रकल्पाची कामे करत होते. तसेच इस्टेट एजंट म्हणूनही काम करत होते. मयूर शनिवारी रात्री कार्यालयात गेले, रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने त्यांच्या भावाने रात्री उशिरा त्यांच्या कार्यालयात जाऊन पाहिले. त्यावेळी मयूर यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचे दिसून आले.
यामुळे ते हादरले, याबाबत त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. मयूर यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी मयूर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोट मिळाली आहे. यामध्ये अनेकांचे देणे-घेणे त्यांनी लिहून ठेवले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव करीत आहेत. दरम्यान, आर्थिक काही कारणांमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. याबाबत पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली असून पुढील तपास देखील सुरू करण्यात आली आहे.