आपल्या देशातील इतिहास, संस्कृती, खाद्य हे सगळ्या जगात प्रसिद्ध आहे. तसेच आपले मसाले देखील सगळीकडे प्रसिद्ध आहेत. का मसाले उत्तम चवीसोबत आरोग्याला फायदे देणारे असतात. मात्र काही मसाले धोकादायक असल्याचे समोर आले आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमधील दोन भारतीय ब्रँडच्या 4 मसाल्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
या मसाल्यांमध्ये अशा केमिकलचं प्रमाण अधिक होतं, जे कॅन्सरची निर्मिती करु शकतात. आता राजस्थानध्ये 5 कंपन्यांच्या 7 मसाले खाण्याच्या लायकीचे नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हे मसाले धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण वारंवार सुट्या मसाल्यांमध्ये भेसळ होऊ शकते, असे म्हटले जाते, तसे समोर देखील आले आहे. आता मात्र नामांकित मसालेही आपली विश्वासार्हता गमावत आहेत. यामुळे त्यांचे ग्राहक देखील चिंतेत पडले आहेत. राजस्थान सरकारने 93 नमुने गोळा केले होते.
यामध्ये 5 मोठ्या भारतीय कंपन्यांचे मसाले सेवन करण्यासाठी पूर्णपणे असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. ज्या भारतीय कंपन्यांचे मसाले खाण्यासाठी असुरक्षित ठरवण्यात आले आहेत, त्यात मोठी नावे आहेत. यामध्ये एमडीएच, एव्हरेस्ट, गजानंद, श्याम आणि शीबा यांचा समावेश आहे.
या ताज्या मसाल्यांमध्ये केमिकलचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त आहे, यामुळे ते आरोग्यासाठी धोकादायक आहे. हे केमिकल कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरतं. यावर भारतीय अन्न सुरक्षातर्फे तात्काळ कारवाई केली जात आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे ग्राहकांचे टेन्शन वाढले आहे.
दरम्यान, यामध्ये एमडीएचच्या गरम मसाल्यामध्ये Acetamiprid, Thiamethoxam आणि Imidacloprid आढळलं आहे. तर भाजी मसाला आणि चना मसाल्यामध्ये Tricyclazole आणि Profenofos प्रमाण जास्त आहे. हे आरोग्यासाठी धोक्याचे आहे. याबाबत एक अहवाल समोर आला आहे.