लॅबचा कर्मचारी सतत असायचा कामावर गैरहजर; वर्षभरानंतर धक्कादायक माहिती झाली उघड अन् सगळेच हादरले

नाशिकमधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. एक क्लर्क असलेला कर्मचारी वर्षभर कामावर आला नव्हता. त्यामुळे त्याचा तपास केला असता, तो एका हत्येच्या गुन्ह्याखाली तुरुंगात असल्याचे समोर आहे. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

फॉरेन्सिक लॅबमध्ये लिपिक असलेला कर्मचारी वर्षभरापासून गैरहजर होता. त्यामुळे तो कामावर का येत नाही? याचा शोध घेण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केला. त्यावेळी तो कर्मचारी एका हत्येप्रकरणी तुरुंगात असल्याचे समोर आले.

तो कर्मचारी गेल्या १५ वर्षांपासून त्या फॉरेन्सिक लॅबमध्ये काम करत होता. विजयसिंग किरीटसिंग सोळंकी असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो सप्टेंबर २०२२ पासून कामाला येत नव्हता. तो मूळचा गुजरातचा आहे फक्त इतकेच कंपनीला माहिती होते.

विजयसिंगबद्दलची जास्त माहिती नव्हती. त्यामुळे फॉरेन्सिक लॅबकडून गुजरात पोलिसांना याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावर विजयसिंगला २००३ च्या एका हत्येच्या प्रकणात अटक करण्यात आली असून सध्या तो तुरुंगात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी सांगितल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनाच धक्का बसला आहे. कारण तो या लॅबमध्ये १५ वर्षांपासून काम करत होता. पण त्याच्याबद्दल कोणालाही माहिती नव्हते. त्याचे खरे नाव विजयसिंग नटवरसिंग सोळंकी असे त्याचे खरे नाव होते.

कंपनीने त्याच्या कामाची कागदपत्रे तपासली असता ती खोटी असल्याचे समोर आले आहे. खोट्या कादगपत्रांद्वारे त्याने ही नोकरी मिळवली होती. पोलिस अधीक्षकांचे प्रमाणपत्रही त्याने बोगस बनवले होते. तसेच त्यावर खोटी सही केलेली होती. आता सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.