बातमी कामाची! राज्याच्या ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज…

राज्यात काही दिवसांपूर्वीच दाखल झालेल्या मोसमी पावसाची गती मंदावल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला जोरदार पाऊस झाला नंतर मात्र त्याने विश्रांती घेतली. आता राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकण, पुणे आणि साताऱ्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्याच्या बऱ्याचशा भागांत पावसाने उसंत घेतली आहे.

दरम्यान, विदर्भात मान्सूनच्या पावसाची प्रतिक्षा आहे. पावसाअभावी विदर्भात कमाल तापमान चाळशीपार पोहोचले. बुधवारी ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वात उच्चांकी ४१.३ अंश तापमानाची नोंद झाली. तर, भंडारा, चंद्रपूर येथेही उकाडा कायम आहे. अनेक ठिकाणी शेतीची कामे सुरू आहेत.

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि साताऱ्यातील काही भागांत आज जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे वादळी वारा आणि वीजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यामुळे येणाऱ्या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. शेतकरी देखील पावसाकडे लक्ष देऊन आहेत. दरम्यान, मुंबईत सध्या पावसाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी पाणी साठले आहे. अनेक ठिकाणी दुकानात देखील पाणी शिरले आहे.

दरम्यान, यावेळी चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत. गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणावर दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आला होता. यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसावे लागले होते. यामुळे यंदा तरी शेती चांगली पिकावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.