मोबाईल फोनने EVM मशीन अनलॉक, OTP मेव्हण्याच्या मोबाईलवर? वायकरांबाबत मोठी माहिती उघड…

नुकतीच लोकसभा निवडणुक पार पडली. यामध्ये अनेकांना धक्का बसला तर अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल समोर आले आहेत. आता या निवडणूकीबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याने मतमोजणी केंद्रात मोबाईल फोन वापरल्याप्रकरणी आणखी एक अपडेट पुढे येत आहे.

यामुळे याबाबत तपास करण्यात येत आहे. ज्या मोबाईल फोनवरुन ईव्हीएम मशिन अनलॉक केलं, तोच मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याला वापरण्यासाठी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यामुळे विरोधक आक्रमक झाले असून कारवाईची मागणी करत आहेत.

याबाबत माहिती अशी की, पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांनी वायकरांचे मेहुणे मंगेश पंडीलकर यांना मतमोजणी केंद्रात आपला फोन वापरायला दिल्याचा आरोप होत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत तपास सुरू आहे.

दरम्यान, हाच फोन EVM मशीनशी जोडलेला होता, त्याच मोबाईल फोनने EVM मशीन अनलॉक करण्यात आलेली होती आणि त्याच मोबाईलवर आलेल्या OTP आलेला होता, असेही सांगितले जात आहे. यामुळे विरोधक याबाबत चौकशीची मागणी करत आहेत.

दरम्यान, मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल फोनच्या वापराला मनाई असताना देखील फोन वापरण्यात आला. आता पोलिसांनी तो मोबाईल फोन जप्त करून FSL ला पाठवला आहे. यामध्ये नेमक काय बाहेर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत.

यामध्ये मोबाईलवरील बोटांचे ठसे घेतले जाणार असून पंडीलकर यांनी कोणाशी बोलणं केलं याचा देखील तपास पोलिस करणार आहेत. दोघांनाही एक नोटीस बजावत हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आलेले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.