टाटांचा मोठा निर्णय! कंपन्यांमध्ये लागू होणार २५ टक्के आरक्षण, नेमकं कोणाला मिळणार आरक्षण, जाणून घ्या…

टाटा समूहाने समाजातील इतर घटकांसाठी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देश-विदेशात कर्मचाऱ्यांसाठी अनुकूल कार्यस्थळ निर्माण करण्यासाठी काही वेगळे निर्णय घेण्यासाठी नेहमीच आघाडीवर राहिली आहे. टाटा समूहाच्या दिग्गज टाटा स्टील या कंपनीने गेल्या शंभर वर्षांपूर्वी कामाच्या ठिकाणी महिल्यांसाठी आरोग्य सेवा तसेच इतर सेवा सुरू केल्या आहेत.

यामध्ये कार्यालयांमध्ये पाळणाघर आणि भविष्य निर्वाहनिधी यासारख्या सुविधा देण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांचे निर्णय नेहेमी कौतुकास्पद असतात. आता असे असताना अजून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता टाटा स्टील लिमिटेड समाजातील ठराविक समुदायांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यावर भर देणार आहेत.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही कंपनी समाजातील काही विशिष्ट लोकांसाठी नोकऱ्यांमध्ये २५ टक्के आरक्षण देणार आहे. यामुळे सध्याच्या आरक्षणाच्या गोंधळात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, आता टाटा स्टीलने म्हटले की कंपनी लिंग अल्पसंख्याक (LGBTQ+), अपंग आणि वंचित समुदायातील लोकांना २५% जागा देईल. लवकरच हे काम पूर्ण होईल. टाटा स्टीलने काही वर्षांपूर्वीच आपल्या झारखंडच्या जमशेदपूर येथील कारखान्यात LGBTQ+ समुदायातील लोकांना कामावर घेण्यास सुरुवात केली होती.

सर्व नोकऱ्या कारखान्याच्या शॉप फ्लोअरवर देण्यात आल्या. याबाबत कंपनीचे मुख्य विविधता अधिकारी जयसिंग पांडा म्हणाले की, आम्ही कामाची जागा विकसित करण्यावर विश्वास ठेवतो जिथे प्रत्येक लिंगाच्या लोकांना मौल्यवान, आदर आणि सशक्त वाटेल, याचा सर्वांना फायदा होईल.

तसेच ते म्हणाले, ही मोहीम सुरू ठेवल्याने दीर्घकालीन यश मिळण्याची खात्री आहे, हीच नाविन्यपूर्णतेची गुरुकिल्ली आहे. कंपनीच्या जमशेदपूर प्लांटमध्ये काम करणाऱ्या एका ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्याने सांगितले की, आमच्या सहकाऱ्यांशी आमचे मत्रीपूर्ण संबंध आहेत आणि आम्हाला मदत करणारे आहेत, त्यामुळे आम्हाला कंपनीत खूप सुरक्षित वाटते.

तसेच कंपनीने आमच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांसह अनेक पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. यामुळे अनेक समाजातील व्यक्तीला याबाबत फायदा होईल. टाटा समूह अनेकदा कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असते. तसेच याबाबत कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना देखील राबविण्यात येतात.