---Advertisement---

हुंडा आणि मुलाच्या हौसेपोटी गर्भवती पत्नीसह ४ वर्षाच्या मुलीचा गळा घोटला! नांदेडमधील सैनिकाचे धक्कादायक कृत्य

---Advertisement---

नांदेड जिल्ह्यातील बोरी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी हुंडा आणि मुलाच्या हौसेपोटी एका सैनिकाने आपल्या गर्भवती पत्नीचा आणि चार वर्षाच्या मुलीचा गळा दाबून खून केला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

या घटनेनंतर आरोपी सैनिक पोलीस ठाण्यात हजर झाला. पाच वर्षांपूर्वी एकनाथ याचे भाग्यश्री केंद्रे हिच्याशी लग्न झाले होते. मात्र त्यांचे पटत नव्हते. हुंड्याच्या पैशावरुन दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. नंतर आपल्याला मुलगा का होत नाही यावरुन देखील त्रास देत होता.

नंतर त्याची पत्नी गर्भवती होती. दरम्यान घटनेच्या दिवशी लग्नात राहिलेला हुंडा आणि मुलगा का होत नाही यावरुन दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. त्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. त्याने पत्नी भाग्यश्रीचा गळा घोटून खून केला. त्यानंतर चार वर्षाच्या चिमुकली मुलीचा झोपेतच खून केला.

भाग्यश्री जायभाये (वय २३) आणि सरस्वती ( वय ४ वर्ष ) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने मात्र मोठी खळबळ जिल्ह्यात उडाली आहे. त्याने सासरच्यांना व्हिडिओ कॉल करून याबाबत माहिती दिली. नंतर स्वतः पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. यामुळे त्याची क्रूरता पुढे येते.

दरम्यान, घटनेनंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. या दुहेरी हत्याकांडाने बोरी गावात शोककळा पसरली आहे. याबाबत पोलीस पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

आरोपी एकनाथ जायभाये हा सैन्यदलात असून राजस्थानमधील बिकानेर येथे तो कर्तव्यावर आहे. सध्या तो सुट्टीवर घरी आला होता. यावेळी ही घटना घडली आहे. यामुळे मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---