पुणे जिल्ह्यातील दौंड येथील यवत पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार संदीप जगन्नाथ कदम हे पायी जात असताना एका टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांना आधी बारामती नंतर पुणे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचे निधन झाले आहे.
हा अपघात बारामती-भिगवण रस्त्यावरील हॉटेल अभिषेक समोर झाला होता. हा नेमका अपघात होता की घडवून आणलेला कट याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत तपास सुरू आहे. संदीप कदम यवत पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकात कार्यरत आहेत.
त्यांनी आपल्या कौशल्याने अनेक गुन्ह्याची उकल केलेली आहे. त्यांचा एक दबदबा होता. अनेक आरोपींना त्यांनी अद्दल घडवली होती. दरम्यान, संदीप कदम हे सायंकाळी व्यायामासाठी घराबाहेर पडले होते.
हॉटेल अभिषेक समोरील रस्त्यावरुन ते पायी जात असताना पाठीमागून आलेल्या पिवळ्या रंगाच्या तीनचाकी टेम्पोने कदम यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे ते गंभीर जखमी झाले.
ते रस्त्याच्या एका बाजूला फेकले गेले. त्यांना बारामती शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. नंतर त्यांना पुढील उपचारासाठी बारामतीहून पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
संदीप कदम यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांचे निधन झाले आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. हे फुटेज पाहिल्यानंतर संदीप कदम यांचा अपघात की घडवून आणलेला कट अशी चर्चा सुरू आहे.