Crime News : सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडिओने खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये ३७ भारतीय सैनिकांना जिवंत जाळल्याचा दावा करण्यात आला आहे. पण लाइटहाऊस जर्नालिज्मने या व्हिडिओचा सखोल तपास केला आणि व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचं सिद्ध केलं. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया…
हा व्हिडिओ ३० जानेवारी २०२४ रोजी मणिपूरमधील कांगपोकपी आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील सीमावर्ती भागात सशस्त्र हल्लेखोरांमध्ये झालेल्या चकमकीत २ जणांच्या मृत्यूची घटना असल्याचं तपासातून समोर आलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ३७ भारतीय सैनिकांना जिवंत जाळल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दृश्यांमुळे अनेकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
लाइटहाऊस जर्नालिज्मने या व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी InVid सारख्या टूल्सचा वापर केला. रिव्हर्स इमेज सर्चद्वारे ईस्ट मोजो या न्यूज पोर्टलने ३१ जानेवारी २०२४ रोजी अपलोड केलेला व्हिडिओ आढळून आला. व्हायरल व्हिडिओ आणि ईस्ट मोजोने अपलोड केलेला व्हिडिओ सारखाच आहे.
ईस्ट मोजोच्या व्हिडिओच्या वर्णनानुसार, मणिपूरमधील कांगपोकपी आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील सीमावर्ती भागात ३० जानेवारी २०२४ रोजी सशस्त्र हल्लेखोरांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जण ठार आणि तीन जण जखमी झाले होते. मृतांची नावे मेश्नाम खाबा मेईतेई (२९) आणि नोंगथोम्बम मिशेल सिंग (३२) अशी आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला ३७ भारतीय सैनिकांना जिवंत जाळल्याचा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. मणिपूरमधील चकमकीत दोन जणांच्या मृत्यूची घटना या व्हायरल व्हिडिओमध्ये आहे.