महिलेच्या पायाला सापाचा गुंडाळा, तीन तास फणा काढून उभा, देवाचं नाव घेतलं अन्…

एका महिलेच्या समोर एक साप तीन तास बसतो. ती महिला अजिबात घाबरत नव्हती, ती महिला धाडस करुन भगवान शिवचे नाव घेत होती, ही घटना उत्तर प्रदेशमध्ये महोबा येथे श्रावणाच्या सोमवारच्या दिवशी घडली. तिथल्या इतर लोकांनी सर्पमित्राला तिथं बोलावून घेतले.

सर्प मित्राने त्या सापाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्या महिलेचा जीव वाचला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विषारी सापाने त्या महिलेला कसल्याही प्रकारची इचा केलेली नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

येथील देवीगंज गावातील राहणारी महिला मिथिलेश यादव रक्षाबंधन असल्यामुळे माहेरी आली होती. ती महिला रात्री झोपली होती. त्यावेळी तिथं एक साप आला. यामुळे एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, त्या महिलेच्या पायाला त्या सापाने गुंडाळून घेतले. महिलेला साप असल्याची जाणीव झाली, त्यावेळी त्या महिलेने देवाचे नाव घेण्यास सुरुवात केली. साप जाईपर्यंत 3 तास ती देवाचे नाव घेत होती.

साप त्या महिलेला चावा घेण्याच्या तयारीत फणा काढून तिथं होता. त्यावेळी त्या महिलेने सापाला हात जोडले आणि देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली. नंतर तो तेथेच शांत राहिला. पोलिसांनी सर्पमित्राला बोलावले आणि सापाला ताब्यात घेतले.

दरम्यान, त्या संपूर्ण गावात या महिलेच्या प्रकऱणाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर त्या देवाचा देखील चमत्कार म्हणता येईल की, त्या महिलेला कसल्याची प्रकारची इजा केलेली नाही, अशी चर्चा लोकांमध्ये होती.