देसाईंच्या अंत्यसंस्कारावेळी फक्त आमिरला आठवली दोस्ती; बॉलिवूडमधून फक्त ‘ही’ ७ लोकं उपस्थित

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाने देशभरात खळबळ उडाली आहे. त्यांनी बुधवारी आपल्या एनडी स्टुडीओमध्येच जीवन संपवले आहे. बॉलिवूडसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अंत्यसंस्कार स्टुडिओमध्येच करावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे शुक्रवारी त्यांच्या स्टुडिओमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काही कलाकारही या अंत्यसंस्कारासाठी एनडी स्टुडिओमध्ये पोहचले होते.

नितीन देसाई यांच्या अंत्यसंस्कारावेळी सगळ्यांचेच डोळे पाणावले होते. त्यावेळी आमिर खान, आशुतोष गोवारीकर यांनी यावेळी नितीन देसाई यांच्या मुलांची आणि पत्नीची भेट घेतली. काही मराठी कलाकारही यावेळी उपस्थित होते.

मधुर भंडारकर, सुबोध भावे, मानसी नाईक असे कलाकार अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. तसेच प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सुद्धा याठिकाणी आले होते. त्या दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.

तसेच मनोज जोशी, मुकेश ऋषी हे कलाकारही यावेळी उपस्थित होते. यावेळी बॉलिवूडमधून मोजून ६ ते ७ कलाकारच नितीन देसाई यांच्या अंत्यसंस्कारासाठी आले होते. तसेच मराठी इंडस्ट्रीतीलही काही मोजकेच कलाकार याठिकाणी उपस्थित होते.

नितीन देसाई यांनी २००५ मध्ये ५२ एकराच्या जागेत स्टुडिओ बनवला होता. तसेच त्यांनी अनेक चित्रपटांचे सेट डिझाईन केले होते. हम दिल दे चुके सनम, राजू चाचा, देवदास, लगान अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी कलादिग्दर्शकाचे काम केले होते.