ऑस्ट्रेलियात पोटची पोरं दुरावली; प्रियदर्शनी पाटलांनी भारतात येऊन नदीत उडी घेत संपवले जीवन

कर्नाटकच्या बेळगावी जिल्ह्यात एनआरआय महिलेने आयुष्य संपवले आहे. याचे कारण समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलियन प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या दोन मुलांच्या सुटकेच्या प्रयत्नात ही मुलगी काम करत होती. यानंतर महिलेने आत्महत्या केली आहे.

याबाबत माहिती अशी की, ऑस्ट्रेलियातील नियम खूपच कठोर आहेत. यामुळे इंजिनीअर महिलेला तिच्या मुलांची सुटका करण्यात अडचणी आल्या. त्यामुळे वैफल्यग्रस्त अवस्थेत महिलेन हा टोकाचा निर्णय घेतला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

प्रियदर्शनी पाटील त्यांचे पती लिंगराज पाटील आणि मुलगा अमर्त्य (१७) मुलगी अपराजिता (१३) यांच्यासोबत ऑस्ट्रेलियात राहत होत्या. नंतर अमर्त्य आजारी पडला. त्याच्या उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले होते. नंतर त्यांच्या मुलांना प्रशासनाने ताब्यात घेतले होते. त्यामुळे प्रियदर्शनी मुलांपासून दुरावल्या. तसेच त्या खूपच खचल्या होत्या.

त्यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली. असे असताना ऑस्ट्रेलियन प्राधिकरणाने डॉक्टरांविरोधात गु्न्हा दाखल करण्याऐवजी प्रियदर्शनी यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली. यामुळे त्यांना धक्काच बसला.

तसेच त्यांच्यावर मुलांची नीट काळजी न घेतल्याचा आरोप करण्यात आला. नंतर मुलांना ताब्यात घेतले. याचा धक्का सहन न झाल्याने प्रियदर्शनी यांनी मलाप्रभा नदीत उडी घेतली. बंगळुरूत पोहोचल्यानंतर लगेच दिवशी प्रियदर्शनी यांनी आत्महत्या केली. यामुळे सगळे प्रकरण समोर आले.

त्यांनी घरी जाण्याची तयारी केली, मात्र त्या घरी गेल्याच नाहीत. त्यांनी हुबळीला जाणारी बस पकडली. त्यांनी रोकड आणि दागिने असलेले पार्सल वडिलांच्या घरी कुरिअरने पाठवून दिले, आणि हे टोकाचे पाऊल उचलले. यामुळे आता चौकशी सुरू आहे.