मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. ते तळेगाव दाभाडे येथील प्लॅटमध्ये राहत होते.
मराठी चित्रपटातील हँडसम हिरो म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत महत्वाचे योगदान दिले होते. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. त्यांचा मुलगाही प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचे नाव गश्मीर महाजनी आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत रवींद्र महाजनी हे खुप प्रसिद्ध होते. पण त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. त्यांची फसवणूक झाली होती, तसेच त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगरही झाला होता.
अभिनय क्षेत्रासोबतच चांगले उत्पन्न मिळण्यासाठी त्यांनी बांधकाम व्यवसायात पाऊल ठेवले होते. पण त्यामध्ये त्यांची फसवणूक झाली होती. अशात त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. त्यामुळे त्यांच्या राहत्या घरावरही जप्ती आली होती.
संकटकाळ आलेला असताना त्यांचा मुलगा गश्मीर हा फक्त १५ वर्षांचा होता. घरची परिस्थिती खराब झाल्यामुळे गश्मीरनेही काम करण्यास सुरुवात केली. त्याने डान्स अकादमी सुरु केली आणि नाटक सिनेमांमध्ये मिळेल ती भूमिका तो करु लागला होता.
तसेच तो डान्स अकादमीमध्येही खुप मेहनत घेऊ लागला. त्याने फक्त दोनच वर्षांमध्ये अकादमीत दम बसवला. त्या संकट काळातून त्याने आपल्या कुटुंबाला बाहेर काढले होते. आता तो मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो. तो रिऍलिटी शोमध्येही सहभागी झाला होता.