नितीन देसाईंना काम न मिळण्यामागे होता बड्या अभिनेत्याचा हात? धक्कादायक माहिती आली समोर

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे संपुर्ण बॉलिवूडच हादरले आहे. त्यांनी त्यांच्या एनडी स्टुडीओमध्ये जीवन संपवले आहे. कर्ज आणि ज्या कंपनीकडून कर्ज घेतले होते, त्यांच्या दवाबामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

नितीन देसाई यांच्यावर २५० कोटी रुपयांचे कर्ज होते. वाढते व्याज आणि स्टुडिओला न मिळणाऱ्या कामांमुळे ते खुप तणावात होते. नितीन देसाई यांना काम देऊ नका, असे काही नामंवत कलाकार म्हणत होते, अशीही चर्चा सर्वत्र होत आहे.

एका बड्या अभिनेत्याने नितीन देसाईंना काम देऊ नका, असे सांगितले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे येणारी कामं बंद झाली होती. कलाकारांमध्ये याबाबत चर्चा होत आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

आपल्या स्टुडिओमध्ये काम येत नसल्याची खंत अनेकदा नितीन देसाई यांनी व्यक्त केली होती. त्यांनी नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या, त्यावेळी त्यांच्याशी यावर चर्चा झाली होती. बॉलिवूडमधील एक मोठी लॉबी त्यांच्या विरोधात होती, असेही त्यांनी सांगितले होते.

अशात एका मोठ्या बॉलिवूड अभिनेत्याचे नावही समोर येत आहे. नितीन देसाई यांना काम दिले जाऊ नये यासाठी एक मोठी लॉबी काम करत होती. पण ते असे का करत होते? यामागेच कारण अद्यापही समोर आलेले नाही.

नितीन देसाई हे प्रसिद्ध कलादिग्दर्शक बनले होते. त्यांना खुप जास्त प्रसिद्ध मिळत होती. त्यामुळे तर बॉलिवूडची लॉबी त्यांच्याविरोधात जात नव्हती ना? असेही म्हटले जात आहे. सध्या पोलिस सर्व गोष्टींचा तपास करत आहे. त्या तपासातून नक्की काय समोर येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.