कौतुकास्पद! ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालं पहिलं पदक, रचला मोठा इतिहास…

सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने खातं उघडलं असून भारताच्या महिला नेमबाज मनू भाकर हिनं कांस्य पदक पटकावलं आहे. यामुळे सर्व भारतीयांसाठी हा एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. भारताच्या मनू भाकरला 10 मीटर पिस्टल स्पर्धेत कांस्य पदक मिळालं आहे.

यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. मनु ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय नेमबाज ठरली आहे. मनुने 10 मीटर एअर पिस्तुलच्या अंतिम सामन्यात 221.7 पॉइंट्ससह कांस्य पदक मिळवले आहे. यामुळे भारताची मान अभिमानाने फुलली आहे.

मनुला रौप्य पदकाची संधी होती, मात्र ती थोडक्यात हुकल्याने तिच्या पदरात कांस्य पदक पडलं आहे. टोक्यो ऑलिम्पिकमधून मनु भाकर हिने 2020 मध्ये पदार्पण केले होते. तेव्हा मनु भाकरची कामगिरी निराशाजनक ठरली होती. तेव्हा ती अपयशी ठरली होती. 

मनुला तेव्हा 12 व्या स्थानी समाधान मानावे लागले होते. मात्र नंतर तिने जोरदार कामगिरी केली आहे. तिने जोरदार कमबॅक करत आता भारतासाठी पहिलं पदक पटकावलं आहे. यामुळे आता देशातून तिचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, भारताचे पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं पदक मनु भाकरने जिंकत शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने मनु भाकरचे कौतुक केलं आहे. सचिन ट्विट करत म्हणाला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकल्याबद्दल मनू भाकरचे अभिनंदन. टोकियोमध्ये हर्ट् ब्रेक झाल्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्यपदक जिंकण्यासाठी दृढनिश्चय दाखवला.

दरम्यान, 2020 साली संधी हुकल्यानंतर तिने खचून न जाता आपला सराव सुरू ठेवला. तेव्हा तिला मोठा धक्का बसला होता. परंतु तिने दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कमबॅक केल्याचं सर्व देशवासियांनी पाहिलं. यासाठी तिने मोठी मेहनत घेतली आहे.