वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील विठ्ठल वॉर्डमध्ये एका घरासमोर बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घराच्या प्रवेशद्वाराला बॉम्बसदृश्य वस्तू अडकवल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर संबंधित वस्तूला असलेल्या वायर्स कापून पोलिसांनी ती निकामी केली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. यानंतर मात्र खरी माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. ही वस्तू प्रवेशद्वाराला या घरात राहणाऱ्या तरुणीच्या प्रियकराने लावली होती.
या बॉम्बसदृश्य गोष्टीमागे प्रेमप्रकरणातून नैराश्य आलेला तरुण होता, अशी माहिती समोर आली यामुळे सगळेच हादरले होते. येथील वंदना ज्ञानेश्वर कारमोरे यांच्या घराबाहेरील गेटवर बॉम्बसदृश्य वस्तूची पिशवी अडकवण्यात आली होती. याबाबत माहिती झाल्यावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, वंदना यांची नात अनुप चोपकरला ही पिशवी दिसून आली. याची माहिती तिने वंदना यांना दिली. सदर पिशवीमध्ये टायमर आणि बॅटरी होती. या पिशवीवर एक चिठ्ठी ठेवण्यात आलेली. ‘हात लावू नका अन्यथा मोठा स्फोट होईल, असे चिठ्ठीत लिहिलेले होते.
पिशवीतील टायमर सदृश्य गोष्टीवर 7.29 असा टाइम दिसत होता. याच टायमरच्या बाजूला बॅटरीही होती. सदर गोष्ट पाहून घर मालकीण घाबरली आणि तीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर याठिकाणी पोलीस लगेच दाखल झाले.
या पिशवतील वस्तूची तपासणी केली असता त्यामध्ये वेगवेगळ्या रसायनांचे मिश्रण तसेच गुल लावलेला कापडही होता. आपल्या प्रेयसीसाठी या तरुणाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या घरापुढे ही बॉम्बसदृश्य गोष्ट लावल्याचा संशय पोलिसांना आहे. याबाबत तपास सुरू आहे.
दरम्यान, वंदना आणि ज्ञानेश्वर यांच्या मुलाचा नुकताच साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याशी घटनेचा संबंध असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ज्या मुलीशी कारमोरे यांच्या मुलाचा साखरपुडा झाला तिच्या प्रियकरानेच ही बॉम्बसदृश्य वस्तू घरासमोर लावली.