Ahmednagar Crime : रात्रीच्या अंधारात मुलगी तरुणाशी बोलत होती, काकानं पाहताच केले कुऱ्हाडीने वार; पुतणी जागीच ठार, नगर हादरले

Ahmednagar Crime : काकाने आपल्याच पुतणीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची घटना अहमदनगर येथे घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, ही तरुणी रात्रीच्या सुमारास अंधारात उभी राहून एका तरुणासोबत बोलत होती. तिच्या काकांनी हे पाहिले. याचा त्यांना भयंकर राग आला. याच रागातून त्यांनी आपल्या विवाहीत पुतणीला संपवलंय.

याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेत आरोपीलाही ताब्यात घेतले आहे. नेहा असे तरुणीचे नाव आहे.

संतोष आरोपीचे नाव आहे. दरम्यान, पुतणीवर संशय आल्याने काका राग आला. यामुळे संताप व्यक्त करत तरुणीच्या दोन्ही पायावर कु-हाडीने वार केले. यामध्ये ती जबर जखमी झाली. यातच तिचे निधन झाले आहे.

दरम्यान, डीवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी संतोष विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे अहमदनगरमध्ये मोठी खळबळ उडाली असून तरुणीच्या आईने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.