Ahmednagar News: एकमेकांच्या हातात हात असलेले माय-लेकराचे मृतदेह पाहुन सगळेच हळहळले, देवा असं नव्हतं व्हायला पाहीजे

Ahmednagar News : अहमदनगरनगरमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील जामखेड तालुक्यातील खर्डा गावालगत असलेल्या अंतरवाली येथील एका पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन भावंडांचा बुडून मृत्यू झाला आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या मुलांना वाचवण्यासाठी आईनेही तलावात उडी मारली. त्या देखील बुडत होत्या. मात्र रोडवरून जाणाऱ्या व्यक्तीने मुलाच्या आईचे प्राण वाचवण्यात यश आले. 

या दुर्दैवी घटनेमुळे खर्डा व परिसरावर शोककळा पसरली आहे. एकाच वेळी या तिन्ही मुलांवर  अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वाचलेल्या आईने मोठा हंबरडा फोडल्याचे पाहायला मिळाले.

तीनही मुलं कपडे धुण्यासाठी आईसोबत तलावाकडे गेली होती.  कपडे धुवत असताना सानिया पाय घसरून तलावातील पाण्यात पडली. सानिया पाण्यात बुडू लागल्याचे पाहतात दीपक, कृष्णा दोघेही तिला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले. यामुळे तिघेही पाण्यात बुडू लागले.

यामुळे त्यांची आई रुपाली तिनेही पाण्यात उडी मारली, मात्र ती देखील पाण्यात बुडू लागली. त्याचवेळी आईने रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांकडे आरडाओरडा केला. यामुळे त्यांचे प्राण वाचले.

यामध्ये मात्र मुले वाचू शकली नाही. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे आईने एकच हंबरडा फोडला. यामुळे गावात शोककळा पसरली होती.