मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असून खातेवाटपही लवकरच करण्यात येणार आहे. सध्या सर्वांचंच लक्ष हे मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे आहे. कारण अनेक आमदार हे नाराज असून कोणाला संधी मिळेल याकडे सगळ्याच इच्छुकांच लक्ष आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेना-भाजप यांना कमी मंत्रिपदं मिळणार आहे. कारण नुकताच अजित पवार गटही सत्तेत सामील झाला आहे. त्यांच्या नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून पुढच्या मंत्रिमडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीला आणखी दोनच मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला कमी मंत्रिपदं मिळणार असल्यामुळे त्यांच्या गटातील नेत्यांमध्येही धुसफूस वाढली आहे. सत्तेसाठी भाजपसोबत आलो आणि इथे मंत्रिपदच मिळणार नाही या विचारांनी काही आमदार नाराज झाल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर तीन आमदारांनी याबाबत नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे.
तसेच राष्ट्रवादीच्या या तीन आमदारांनी आपण वेगळी भूमिका घेणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. मंत्रिपद मिळत नसल्यामुळे माणिकराव कोकाटे, अतुल बेनके आणि किरण लहामटे या तीन आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच वेगळी भूमिका घेणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. ज्यांच्यामागे चौकशा सुरु आहे. तसेच त्यांनी इतकी वर्षे सत्ता भोगली आहे. त्यांनाच मंत्रिपदं दिली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे हे तीन आमदार नाराज झाल्याचे म्हटले जात आहे.
शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्यासारख्या नेत्यांना सोडून अजित पवार गटात ते सत्तेसाठी आले आहेत. असे असतानाही मंत्रिपद मिळणार नसेल तर वेगळी भूमिकाच घेतलेली बरी असे त्या आमदारांचे म्हणणे आहे. हे आमदार नाराज आहेत, त्यामुळे त्यांची समजूत काढणंही अजित पवारांसाठी गरजेचं झालं आहे.
अशात अजित पवार सत्तेत आल्यामुळे शिंदे गटातील आमदारांचे टेंशन वाढले आहे. आता त्यांचे मंत्रिपदं कमी होणार आहे. तसेच राष्ट्रवादीला महत्वाची खाती दिली जाणार आहे. त्याला शिंदे गटातील आमदारांनी विरोध केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना दिल्लीचे ऐकावे की आपल्या आमदारांचे असा प्रश्न पडला आहे.