बदलापूर घटनेप्रकरणी अजित पवार यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले, आरोपीचे सामानच…

बदलापुरमध्ये शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलने केली जात असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. याप्रकरणात बदलापूरकर रस्त्यावर आणि रेल्वे ट्रॅकवर उतरले होते. दिवसभर याठिकाणी आंदोलन सुरू होते. यामुळे हे प्रकरण राज्यात गाजले.

यामुळे यंत्रणा कामाला लागली. आता यवतमाळ येथील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार संताप दिसून आला. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केले आहे. राज्यात महिलांवर, मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे. त्यांना कायद्याचा धाक बसला पाहिजे.

तसेच ते म्हणाले, माझ्या भाषेत सांगायचे तर त्यांचे सामानाच काढले पाहिजे, असे वक्तव्य, असा संताप त्यांनी व्यक्त केला. परत नाहीच, हे केलचं पाहिजे, असे नालायक काहीही लोक आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं आहे.

कशापद्धतीने आज काही लोक नालायकपणा करत आहेत. आज कुठं कुठं काही काही घटतंय, त्याच्याबद्दल कडक आणि ठोस भूमिका या सरकारने स्वीकारलेली आहे. विरोधकांनी त्यांच्या पद्धतीने जो काय विरोध करायचा तो करा, असेही अजित पवार यांनी सांगितले.

तसेच ते म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे. त्याबद्दल मला काही बोलायचे नाही, असे अजितदादा म्हणाले आहे. दरम्यान, या प्रकरणी सध्या आरोपीची चौकशी केली जात आहे. याबाबत रोज अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.