स्वतःसह पत्नीचाही गळा ब्लेडने चिरला आणि संपवले आयुष्य; घटनेमागील धक्कादायक कारण आले समोर

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी पत्नीचा ब्लेडने गळा चिरून खून करून पतीनेही स्वत:चा ब्लेडने गळा चिरून आत्महत्या केली.

काही दिवसांपासून सुशील हा आर्थिक विवंचनेत सापडला असल्याची माहिती आहे. याच आर्थिक तंगीतून त्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्याची माहिती आहे. सकाळी लवकर मुलांची शाळेत परीक्षा असल्याने दोघेही लवकरच जागे झाले. मात्र, आई- वडील जागे झाले नव्हते.

यामुळे दोघांनी त्यांच्या खोलीत जाऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ आवाज देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने मुलांनी शेजारी राहणारे चुलयांना हाक मारली. अनिल बोरकर यांनीही आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी पाठीमागून जाऊन मागचा दरवाजा तोडला.

यावेळी सर्वांना एकच धक्का बसला. यावेळी सरिता बिछान्यावर तर सुशील खाली गळा चिरलेल्या अवस्थेत दिसून आला. नंतर या प्रकाराची माहिती गोबरवाही पोलिसांना देण्यात आली. याठिकाणी काही वेळातच पोलीस आले.

दरम्यान, खोलीत एक ब्लेड आढळून आला. त्यामुळे पत्नीचा ब्लेडने गळा चिरून खून करून सुशिलनेही त्याच ब्लेडने आपला गळा चिरून आत्महत्या केल्याचा संशय आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

आतून दार बंद असल्याने बाहेरून कुणी व्यक्ती खोलीत येण्याची शक्यता नव्हती. यामुळे ही आत्महत्याच असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत नातेवाईकांना या घटनेमुळे एकच धक्का बसला आहे.