Amol Mitkari : रावणाचे मंदीर बांधण्याची अमोल मिटकरींची घोषणा, अधिवेशनात करणार ‘ही’ मोठी मागणी

Amol Mitkari : आपल्या देशात श्रीरामाची पूजा होणे आणि त्याचा शत्रू म्हणून रावणाची हेटाळणी होणे, ही सर्वसामन्य बाब आहे. असे असताना अकोला जिल्ह्यातील सांगोळा नावाच्या गावी रावणाची सद्गुणांमुळे पूजा केली जाते. याला शेकडो वर्षांची प्राचीन परंपरा लाभली आहे. आजही अनेक भागात रावणाला देव मानले जाते.

असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी सांगोळा येथील रावणाच्या मंदिरात सभागृहाच्या बांधकामासाठी आमदार निधीतून २० लाख रुपये दिले आहेत. रावण दहन परंपरेला त्यांनी विरोध केला. यामुळे याची चर्चा रंगली आहे.

काही भागात आदिवासी बांधवांमध्ये देखील रावणाला देव मानतात. रावण दहन परंपरेला अमोल मिटकरी यांनी विरोध दर्शवला होता. रावण हा राक्षसांचा राजा होता, असे पुस्तकात आहे. अनेक ठिकाणी रावणाची मंदिरे आहेत.

आदिवासी लोक रावणाची मनोभावे पूजा करतात. रावण चरित्र्य, प्रखांड पंडित, शिवभक्त आणि अभ्यासू होता, असे मिटकरींनी सांगितले, यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रावण दहन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार मिटकरी यांनी सांगितले. यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात रावण दहनाविरोधात शासन निर्णय व्हावा, यासाठी भूमिका मांडणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

अनेक ठिकाणी रावणाची मंदिरे आहेत. आदिवासी लोक रावणाची मनोभावे पूजा करतात, असेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.