भयानक! आधी पत्नी अन् पुतण्याला संपवलं, नंतर स्वत:ला; ACP च्या कृत्याने पुणे हादरलं

पुण्यातील बाणेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावती दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त भरत गायकवाड यांनी गोळ्या झाडून पत्नी आणि पुतण्याची हत्या केली आहे. त्यानंतर त्यांनी स्वत:लाही गोळी मारुन संपवलं आहे.

या घटनेमुळे संपुर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी मध्यरात्री ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. चतुश्रृंगी पोलिस या घटनेचा तपास करत आहे.

भरत गायकवाड यांनी पत्नी मोनी गायकवाड (वय ४४) आणि पुतण्या दीपक गायकवाड (वय ३५) यांची गोळी झाडून हत्या केली आहे. दोन खून केल्यानंतर भरत गायकवाड यांनी स्वत:लाही गोळी मारुन संपवलं आहे.

या घटनेमुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. गायकवाड यांच्या मुलांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. चतुश्रृंगी पोलिस या घटनेचा तपास करत आहे. भरत गायकवाड यांनी दोन हत्या का केल्या आणि त्यानंतर त्यांनी स्वत:ला का संपवलं? या मागचं कारणही अद्याप समजू शकलेलं नाही.

भरत गायकवाड हे अमरावती पोलिस दलात सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून काम करत होते. त्यांचे कुटुंब हे पुण्यात राहत होते. सुट्टी घेऊन ते पुण्यात काही दिवसांसाठी राहण्यासाठी आले होते. त्यामुळे असे काही घडेल याची कल्पना सुद्धा कोणाला नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, भरत गायकवाड हे शनिवारीच पुण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री जेव्हा ही घटना घडली तेव्हा गायकवाड यांच्या आई आणि त्यांची मुले घरात झोपलेली होती. पण अचानक गोळीचा आवाज आल्यानंतर त्यांना जाग आली. घडलेली भयानक घटना पाहून मुलं घाबरली होती. त्यानंतर त्यांनीच याबाबत पोलिसांना माहिती दिली.