Amravati Jeweler Murder : अमरावती येथील तिवसात त्रिमूर्तीनगरातील सराफा व्यावसायिकाचा खून करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संजय भगवंत मांडळे (५५) असे त्यांचे नाव असून खून व जबरी चोरी त्यांच्याकडे काम करणाऱ्या मिस्त्रीनेच केल्याचे उघड झाले आहे.
याबाबत पोलीस तपास करत आहेत. त्याच्याकडून ७ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात केला. आरोपी हा मृताच्या अंत्यसंस्कारासह इतर कार्यावेळी सुद्धा उपस्थित होता. पोलिसांनी २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा उलगडा करत आरोपीला अटक केली.
याबाबत माहिती अशी की, संजय मांडळे हे एकटेच घरी होते. त्यावेळी रोशन हा दारू प्राशन करून त्यांच्या घरी गेला. त्याने मजुरीपेक्षा अधिक पैशांची मागणी संजय मांडळे यांच्याकडे केली. त्यास संजय मांडळे यांनी नकार दिला. यामुळे हा वाद वाढतच गेला. यातून ही घटना घडली आहे.
सराफा व्यावसायिक संजय मांडळे यांचा मृतदेह त्यांच्याच घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. अज्ञाताने हत्या करून ७४ लाख ६८ हजारांचा ऐवज लंपास केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले होते.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला. तपासादरम्यान संजय मांडळे यांच्या घरी गवंडी काम करणाऱ्या मिस्त्री रोशन तांबटकर याच्यावर पोलिसांना संशय आला. त्यामुळे त्याची उलटतपासणी घेण्यात आली.अधिक चौकशी केली असता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली.
दरम्यान, संजय मांडळे हे एकटेच घरी होते. त्यावेळी रोशन हा दारू प्राशन करून त्यांच्या घरी आला. त्याने मजुरीपेक्षा अधिक पैशांची मागणी संजय मांडळे यांच्याकडे केली. याला संजय मांडळे यांनी नकार दिल्यावर रोशनने लाकडी दांड्याने त्यांच्या डोक्यावर वार करुन त्यांचा खून केला.