Amravati news : सध्या वर्ल्डकप हरल्याच्या रागात अमरावतीत (Amravati) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आता वर्ल्डकप हरल्यामुळे दोन भावांमध्ये वाद झाला आणि वाद एवढा विकोपाला गेला की, मोठ्या भावानं रागाच्या भरात स्वतःच्या सख्ख्या लहान भावाची हत्या केली आहे.
येथील अंजनगाव बारीत ही धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी की, मटण खाऊन आले म्हणून भारत हरला, असं म्हणत दोन सख्ख्या भावाभावांमध्ये वाद झाला. हा वाद वाढतच गेला.
रागाच्या भरात मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावावर लोखंडी सळईने हल्ला केला. यामध्ये लहान भावाचा मृत्यू झाला. तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेने मात्र खळबळ उडाली आहे.
या मारहाणीत अंकित इंगोले (वय 28) याचा मृत्यू झाला. तसेच वडील रमेश इंगोले गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस याठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी मोठ्या भावाला तात्काळ अटक केली आहे.
मोठा भाऊ प्रवीण यास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, टीम इंडियाचा (Team India) वर्ल्डकप फायनलमध्ये (ICC World Cup 2023 Final) पराभव झाला आणि देशातील जनतेचा हिरमोड झाला. यामुळे अनेकांनी राग व्यक्त केल्याच्या घटना घडल्या आहेत.
या सामान्यानंतर संपूर्ण देशाचे डोळे पाणावले होते. वर्ल्डकप सुरू झाल्यापासूनच फॉर्मात असलेल्या टीम इंडियाचा फायनलमधला परफॉरमन्स अनेकांना पचवताच आला नाही. यामुळे अनेकांनी आपल्या घरातील टीव्ही देखील तोडले.