Amruta Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सतत चर्चेत असतात. अनेकदा त्यांना ट्रोल केले जाते. त्यांच्या गाण्यांमुळे, तर कधी त्यांच्या ड्रेसिंगमुळे त्या ट्रोल होतात. सोशल मीडियावर त्या सतत चर्चेत असतात. अनेक विषयांवर त्या ठामपणे मत मांडतात.
तसेच रील्स व फोटोज शेअर करत असतात. कधी त्यांच्या पोस्टचे कौतुक होतं, तर कधी त्या ट्रोलर्स निशाण्यावर आलेल्या आहेत. असं असलं तरी, त्या ट्रोलर्सकडे फारसं लक्ष देत नाहीत. त्या पोस्ट करतच असतात. आता देखील त्या चर्चेत आल्या आहेत.
आता त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या कारमध्ये बसून डान्स करताना दिसल्या. या व्हिडीओमध्ये त्या ट्रॅफिकमध्ये अडकल्या आहेत. आता ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवण्याचा मोह त्यांना आवरला नाही. मात्र आता त्यांच्यावर टीका केली जात आहे.
कारमध्ये त्यांनी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून त्यांच्या कानातले आणि अंगठी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्या या व्हिडिओची चर्चा होत आहे. तर काही नेटकऱ्यांनी मात्र या व्हिडीओवरुन त्यांना जोरदार ट्रोल केले आहे. ट्रॅफिक जॅममध्ये थोडंसे मनोरंजन, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.
यावर नेटकरी संतापले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, हे काय आहे. मी चाललो मारायला आता. आणखी एक नेटकरी यावर म्हणाला, मी ५०० रुपये देतो. पण ही पोस्ट कृपा करून डिलिट करा. तसेच, अजून एक नेटकरी यावर म्हणाला, परमेश्वर, देवेंद्र फडणवीस यांना अधिकाधिक सहनशक्ती प्रदान करो हीच प्रार्थना.
दरम्यान, अमृता यांचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आला आहेत. अनेकांनी यावर लाइक्स आणि कमेंट्स करून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. असे असताना त्यांच्या चाहत्यांना मात्र हा व्हिडीओ चांगलाच आवडला आहे.