सध्या गणपतीचे आगमन काही तासांवर आले आहे. यामुळे सर्वांची तयारी सुरू आहे. असे असताना आता अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी येत आहेत. यामुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण निर्णय होण्याची शक्यता होती. गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद-ए-मिलादनिमित्त काढण्यात येणारे जुलूस एकाच दिवशी आले आहे.
यामुळे मुस्लिम बांधवांनी ईदनिमित्त काढण्यात येणारे जुलूस दुसऱ्या दिवशी काढावे, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले होते. यामुळे नवी मुंबईतील मुस्लिम बांधवांनी याबाबत चांगला निर्णय घेतला. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.
गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ सप्टेंबर रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे पोलिस तसेच गणेशोत्सव मंडळांकडून स्वागत केले जात आहे. यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.
याबाबत गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व मुस्लिम बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, दोन्ही सण शांततेत साजरे व्हावेत, यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत.
अनेकदा समाजकंटक गर्दीचा फायदा घेत गैरप्रकार करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न करतात. यामुळे पोलिस सतर्क आहेत. या काळात कोणीही चुकीचे काम करताना दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असेही पोलिसांनी सांगितले.
दोन्ही सण शांततेत साजरे व्हावेत, यासाठी पोलिसांकडून आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आम्ही अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी ईद-ए-मिलादनिमित्त जुलूस काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे आलम बाबा यांनी सांगितले.