राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप? अजित पवार मध्यरात्री अचानक दिल्लीत, नेमकं कारण काय?

सध्या राज्यात विधानसभा निवडणुक जवळ आली असून यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता अजित पवार यांच्या कालच्या धावत्या दिल्ली दौऱ्याचे पडसाद राज्यातील राजकारणात उमटत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्यरात्री अजित पवार यांनी त्यांच्या सहाकाऱ्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

यामुळे ही भेट नेमकी कशासाठी होती, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि भाजप नेते यांच्यावर वाद सुरू आहे. अनेक नेते एकमेकांवर टीका करत आहेत. दिल्लीत या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाली. या बैठकीचा तपशील अजून बाहेर आला नाही.

अजित पवारांसोबत सोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे पण उपस्थित होते. रात्री एक वाजता ही भेट झाल्याने राज्यात अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. अचानक ही भेट झाली आहे. यामुळे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दिल्लीत ही चर्चा ४०-४५ मिनिटं चालली.

इतक्या मध्यरात्री झालेल्या या भेटीत काय घडामोड घडली याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अवघ्या सात तासांच्या या दौऱ्याने राज्यात एकच चर्चा रंगली आहे. सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. दिल्लीत पण मोठ्या घडामोडी घडत आहेत.

त्यातच आता मध्यरात्री अजित पवार यांच्या धावत्या दौऱ्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. रात्री एक वाजता त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. याबाबत अजित पवार यांनी कोणतीही माहिती दिली नाही. भाजपचे काही नेते तसेच शिंदे यांचे नेते अजित पवार यांनी निधी न दिल्याने नाराज आहेत.

याबाबत अजित पवार यांनी देखील निधी नसल्याचे सांगितले असून यावर देखील नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. तर सकाळी ८ वाजता अजितदादा हे मुंबईत हजर होते. त्यांच्यासोबत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पण उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.