‘हा काय फालतूपणा आहे, म्हणून कोणी मत देत नाही’; मराठी अभिनेत्याची अमित ठाकरेंवर घणाघाती टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे हे नेहमीच चर्चेत असतात. गेल्या दोन तीन दिवसांपासून एका टोल नाक्यामुळे चर्चेत आहे. अमित ठाकरेंना टोलवर अडवण्यात आल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाका फोडला आहे.

अमित ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहे. महाराष्ट्रात लवकरच निवडणूका होणार आहे. त्यामुळे अमित ठाकरेंसाठी हा दौरा महत्वाचा आहे. अशातच सिन्नर तालुक्यात त्यांच्यासोबत असे काही घडली की संतापात मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाकाच फोडला.

सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर मोठा राडा झाला होता. अमित ठाकरेंचा टोलनाक्यावर अपमान झाला होता. त्यांना अर्धा तास तिथे थांबवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे आम्ही तो टोलनाका फोडला, असे त्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

अमित ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रया दिली होती. राज साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद झाले आहेत. माझ्यमुळे अजून एक टोलनाका त्यामध्ये ऍड झाला, असे अमित ठाकरे यांनी म्हटले होते. अमित ठाकरेंची ही प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

सोशल मीडियावरही तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. मनसे सैनिकांनी टोलनाका फोडल्यामुळे अनेकांनी टीकाही केली आहे. आता मराठी अभिनेता आरोह वेलणेकरने यावर ट्विट केले आहे. त्यामुळे तोही आता चर्चेत आला आहे.

हा काय फालतूपणा आहे. म्हणून कोणी मत देत नाही, असे ट्विट आरोह वेलणेकरने केले आहे. आरोह वेलणेकरचे हे ट्विट सोशल मीडियावर खुप व्हायरल झाले आहे. तसेच आता या ट्विटवरुनही मोठा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.