---Advertisement---

दरवाजा उघडताच दिसेल त्याला कापले! पत्नी, मेव्हणा, सासूची हत्या; तिहेरी हत्याकांडाने नगरमध्ये खळबळ

---Advertisement---

एका गावात एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ उघडकीस आला आहे. शुल्लक कारणावरून जावयाने धारदार शस्त्राने वार करत पत्नी, मेहुणा आणि सासूचा निर्घृण खून केला.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्य झाला आहे. सासरे आणि मेहुणी गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. राहता तालुक्यातील सावळीविहिर वाडी येथे पत्नी माहेरी राहत होती.

यामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. याच कारणावरून सुरेश निकम यांचा पत्नीसोबत आणि तिच्या माहेरच्या लोकांसोबत अनेक वर्षांपासून सतत वाद सुरु होते. या वादातूनच ही घटना झाल्याचे समोर आले आहे.

वेडेपणाची परिसीमा ओलांडत आरोपी सुरेश निकम अंधारात पत्नीच्या माहेरी पोहोचला. दरवाजा उघडताच त्याने चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली. घरात 6 लोक होते, त्याने कोणालाही सोडले नाही.

त्याने एक एक करून सर्वांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. जखमी कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, आरोपीने 5 ते 6 मिनिटांत आपले काम पूर्ण केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. 

या प्रकरणातील संशयित सुरेश निकम आणि त्याचा चुलत भाऊ रोशन कैलास निकम यांना नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात खुनासह अनेक गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नी वर्षा सुरेश निकम (वय. २४ वर्षे), मेहुणा रोहित चांगदेव गायकवाड (वय . २५) आजे सासू हिराबाई द्रौपद गायकवाड (वय. 70 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास जावई पत्नीच्या घरी गेला, आणि सासरच्या लोकांवर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला.

या घटनेत पत्नी, मेहुणा आणि सासूचा जागीच मृत्यू झाला. तर जावयाच्या हल्ल्यात सासरा आणि मेहुणी मध्यस्थी करत असताना दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना शिर्डी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, घटनास्थळी शिर्डीचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील दाखल झाले. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके आणि पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---