बैलांना चारा टाकायला गोठ्यात गेले वडील, समोरचं भयंकर दृश्य पाहून हंबरडाच फोडला

सध्याच्या युगात खुप स्पर्धा सुरु आहे. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सगळेच जण प्रयत्न करत आहे. पण अनेकदा अपयश येत असल्यामुळे लोक त्याचा तणाव घेतात आणि टोकाचं पाऊल उचलताना दिसतात. अशीच एक घटना बुलढाण्यातून समोर आली आहे.

एका २३ वर्षीय तरुणाने तणावातून जीवन संपवले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडाराजा तालुक्यातील वर्दडी बु या गावातून ही घटना समोर आली आहे. अशोक कलाजी असे त्या तरुणाचे नाव होते.

त्या तरुणाने आपल्या गोठ्यातच जीवन संपवले आहे. ८ ऑगस्टला रात्री अशोकच्या कुटुंबाचे जेवण झाले होते. त्यानंतर त्याचे वडील बैलांना चारा देण्यासाठी साडेनऊच्या सुमारास गोठ्यात गेले होते. त्यावेळी त्यांनी जे बघितलं तेव्हा त्यांना धक्काच बसला.

अशोकच्या वडिलांनी बघितलं की तो तिथे पडलेला होता. मुलाला त्या अवस्थेत पाहून त्याचे वडील ओरडायला लागले. त्यांचा रडण्याचा आवाज ऐकून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही गोठ्याकडे धाव घेतली.

तसेच शेजारी असलेले अशोक दहातोंडे, नंदलाल अटोळे, विनायक काकडे, संजय लिपने यांनीही तिकडे धाव घेतली. त्यांच्या मदतीने अशोकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता.

किनगाव राजा पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अशोकने असे का केले याबाबतचे कारण अजूनही समोर आलेले नसून पोलिस त्याचा तपास करत आहे. याप्रकरणाचा तपास ठाणेदार वाघमारे यांच्या मार्गदर्शनात त्यांचे पथक करत आहे.